फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला ब्लॅकमेल; तरुणाला बेड्या!
मानपाडा पोलिसांची कारवाई; तक्रारीनंतर कुणाल शिंगाडे पोलिसांच्या ताब्यात
डोंबिवली : फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला सातत्याने ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल शिंगाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कुणाल शिंगाडे हा डोंबिवलीतील शिरढोण परिसरात राहत असून त्याची संबंधित विवाहितेशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने विवाहितेला तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.धमकी देत आरोपीकडून विवाहितेला सातत्याने ब्लॅकमेल केले जात होते. या प्रकाराला कंटाळून अखेर विवाहितेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीची दखल घेत मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुणाल शिंगाडे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस क�
Kalyan, Thane | Oct 6, 2026