गणेशोत्सव आणि धार्मिक श्रद्धांबाबतच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस!
मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. गणेशोत्सव, भगवान गणेश आणि हिंदू धार्मिक परंपरांबाबत केलेल्या कथित वक्तव्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे.
नोटीसमध्ये ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण आणि बिनशर्त माफी मागण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात बापट यांनी मांडलेल्या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा झाली होती.
ध्वनीप्रदूषण आणि लाऊडस्पीकरविरोधात भूमिका मांडण्याचा अधिकार असला तरी धार्मिक श्रद्धा किंवा परंपरांचा अवमान होऊ नये, असा नोटीसमधील दावा आहे.
आता विद्यानंद बापट या नोटीसीला काय उत्तर देतात?
📌 अधिक अपडेट्ससाठी Times of Maharashtra फॉलो करा.
#VidyanandBapat #विद्यानंदबापट #Ganeshotsav #गणेशोत्सव #PuneNews #Pune #PuneBreakingNews #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #LegalNotice #कायदेशीरनोटीस #PradeepNaik #GaneshFestival #Ganeshotsav2026 #PuneUpdates #Maharashtra #MarathiNewsUpdate #NewsUpdate #LatestNews #DJ #NoisePollution #PuneNewsUpdate #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews
Pune City, Pune | Sep 10, 2026