महाड: महाड तालुक्याला वादळी पावसाने झोडपले
Mahad, Raigad | May 11, 2026 मागील तीन दिवसात दुसऱ्यांदा काल दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या शहरासह तालुक्यातील वादळी अवकाळी पावसाने तालुक्याच्या चांभार खिंड, चांडवे खुर्द व कांबळे तर्फे महाड या गावातील 20 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाल्याची प्रामिक माहिती हे वृत्त लिहित असताना सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे. दरम्यान महाड शहरातील चांदेक्रीडांगण परिसरात व शहराच्या विविध भागात झाडे उन्मळून पडल्याने तर नवे नगर येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात एका घराचे पत्र्याचे छप्परच येऊन पडल्याचे निदर्शनास आले असून सुदैवाने या सर्व ठिकाणी कोणतीही दुखापत अथवा जीवित हानी झाली नसण्याची माहिती महाड आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून देण्यात आली.