महाड: सापे-वामने रेल्वे स्थानकाचे भोग संपणार कधी ?
Mahad, Raigad | Jun 27, 2026 कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुयातील सापे-वामने रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सुमारे १.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असतानाही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने मार्च २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी स्थानकाची सद्यस्थिती पाहता हे काम वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. महाड तालुयातील वीर, सापे-वामने, करंजाडी आणि विन्हेरे ही कोकण रेल्वेवरील महत्त्वाची स्थानके आहेत.