शहादा: सावखेडा गावाच्या वळणावर अज्ञात आयशर वाहनाच्या धडकेत परीक्षा देण्यासाठी जाणारे वडगाव येथील दुचाकीस्वार २ गंभीर जखमी
शहादा तालुक्यातील सावखेडा गावाच्या वळणावर अज्ञात आयशर वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने वडगाव येथील दुचाकीस्वार दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच आयशर वाहन चालक घटनास्थळावरून प्रसार झाला. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी दूरपर्यंत फेकली गेली. यावेळी उपस्थित नागरिकांनी जखमी शालेय विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वडगाव येथील दोन्ही युवक हे शहादा येथे परीक्षा देण्यासाठी येत होते.