शहादा: बामखेडा गावातील पुलासमोर रस्ता ओलांडणाऱ्या ७७ वर्षीय महिलेला दुचाकीने धडक दिल्याने जागीच मृत्यू
बामखेडा गावातील पुलासमोर भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकल चालकाने एका महिलेला रस्ता ओलांडत असताना धडक दिल्याने तीचा मृत्यू झाला. ही घटना २० मार्चला सायंकाळी घडली याप्रकरणी सारंगखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरसायकल क्र. जीजे ५ डीएल ००८५ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थिती कडून दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील दुचाकी शेवंताबाई भिल यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.