शहादा: लोणखेडा येथील बजरंग नगरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून पळविले
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील बजरंग नगरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा विविध ठिकाणी शोध घेतला असता मात्र मिळून आली नाही तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फुस लावून पळवून नेले आहे.