शहादा: समोसा ग्राउंड जवळील रस्त्याच्या बाजूला घराजवळ उभ्या असलेल्या कारला ट्रॅक्टरची मागून जोरदार धडक, कार चक्काचूर
शहादा शहरातील समोसा ग्राउंड जवळील रत्याच्या बाजुला घराजवळ उभ्या असलेल्या कारला भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक देत २० ते २५ फूट फरपटत नेले. कार विजेच्या खांब्यावर आदळल्याने अपघात झाला. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.दर्शन वसंत पटेल यांच्या मालकीची नेक्सन फ्रॉनेक्स कंपनीची निळ्या रंगाची कार (एम.एच. १८ बी.एस.७२१७) भरधाव ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने जोरात धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे .