रामटेक: जागतिक महिला दिनी रामटेक येथे महिलांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे उत्साहात आयोजन
Ramtek, Nagpur | Mar 8, 2026 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गांधी चौक रामटेक येथे रविवार दिनांक 8 मार्चला सकाळी साडेसात वाजता पासून ते सकाळी दहा वाजता पर्यंत महिलांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फ्रेंड्स फोरेवर मंडळ रामटेक यांच्या विद्यमाने हे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तीन वयोगटात स्पर्धा घेण्यात आली. अ गटात उर्वशी सोनगेंदे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. ब गटात विजयश्री हटवार हिने तर क गटात रजनी वाहने हिने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. शकुंतला धावडे हिला प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात आला.