महाड: समग्र अभियानांतर्गत २ लाख २५६ विद्यार्थांना पुरविणार मोफत पाठ्यपुस्तके
Mahad, Raigad | May 25, 2026 दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तके यांचे वाटप होणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात येतात. यावर्षी म्हणजेच सन 2026-2027 या शैक्षणिक वर्षात 2 लाख 256 विद्यार्थ्यांना 10 लाख 89 हजार 195 पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.