कामठी: कामठीत पाच दिवसीय संगीतमय ‘श्री श्याम कथा’ महोत्सवाचे आयोजन
Kamptee, Nagpur | May 19, 2026 कामठी येथील गुड ओली भागातील अग्रवाल भवन जवळ असलेल्या 'श्री सीता रामजी खाटू श्यामजी महाराज मंदिर' येथे 'पुरुषोत्तम मास' च्या पावन पर्वावर भव्य पाच दिवसीय संगीतमय 'श्री श्याम कथा' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे रसपान भाविकांना करता येणार आहे. या धार्मिक सोहळ्याचे कथा वाचन विख्यात कथा वाचक भागवतभूषण पंडित श्री आशिष कुमारजी शर्मा हे करणार आहेत.