शिमल्यात डोंगराचा मोठा भाग अचानक तडकला! झाडांसहित मलबा कोसळला, VIDEO व्हायरल
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या फांचा कांडा परिसरात शुक्रवारी डोंगराचा मोठा भाग अचानक तडकून कोसळला. झाडांसहित मोठ्या प्रमाणात मलबा खाली आल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.
घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना आणि स्थानिकांना बाधित भागापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. डोंगराचा भाग कोसळल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिमल्यात डोंगराचा मोठा भाग अचानक तडकला!
झाडांसहित मोठा मलबा कोसळला
डोंगर कोसळल्याने परिसरात घबराट
बाधित भागापासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
#Shimla #Rampur #HimachalPradesh #Landslide #Rockfall #BreakingNews #ViralVideo #HimachalNews #SafetyAlert
Pune City, Pune | Sep 12, 2026