कामठी: कामठी नगर परिषदेच्या शाळांत उत्साहात प्रवेशोत्सव
Kamptee, Nagpur | Jun 30, 2026 कामठी नगर परिषद संचालित खुर्शीद हक उर्दू कन्या प्राथमिक शाळा, अब्दुल सत्तार फारूकी शाळा आणि चौधरी दयालसिंह यादव प्राथमिक शाळेत आज नवीन शैक्षणिक वर्षाचा 'प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शालेय बॅग, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.