कामठी: उनगाव ग्रामस्थांचा 'सुनील फेरो' कंपनीविरोधात एल्गार; प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त
Kamptee, Nagpur | Apr 21, 2026 उनगाव ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या 'सुनील फेरो प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कंपनीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनीचे, हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण होत असल्याने गावकरी आक्रमक झाले असून, कंपनी त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबद्दलची अधिक माहिती जिल्हा परिषद माजी सभापती अवंतिका ताई लेकुरवाळे यांनी दिली आहे