मोशीत 'चाईल्ड किडनॅपिंग'ची निव्वळ अफवा; गैरसमजातून दोन मूकबधिर तरुणांना नागरिकां कडून बेदम मारहाण
मोशी परिसरात लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या निव्वळ अफवेवरून आणि संशयावरून दोन मूकबधिर तरुणांना दोरीने बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) घडला. मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत केलेल्या सखोल तपासात हे दोन्ही तरुण मदतीसाठी देणगी गोळा करणारे असल्याचे स्पष्ट झाले असून, मुले पळवण्याचा संशय पूर्णपणे निराधार ठरला आहे.
#moshi #pimprichinchwad #news #update #pcmc
Pune City, Pune | Nov 14, 2026