कामठी: कामठीत साकारणार जगातील सर्वात मोठा 'संविधान ग्रंथ'; ड्रॅगन पॅलेस येथे निर्मितीचा शुभारंभ
Kamptee, Nagpur | Apr 13, 2026 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात एका ऐतिहासिक उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. येथे जगातील सर्वात मोठा 'संविधान ग्रंथ' साकारण्यात येणार असून, या भव्य प्रकल्पाच्या निर्मितीचा सोहळा आज, १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.या ऐतिहासिक कार्याचा शुभारंभ भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.