महाड: ऐतिहासिक मैलांच्या दगडांचे जतन आवश्यक
Mahad, Raigad | May 28, 2026 शिवकालीन काळापासून महाड शहराचा असलेला उल्लेख व त्या पक्षात ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीने शहराची असलेली ओळख लक्षात घेता या शहरांमध्ये हुतात्मा वसंत दाते चौकात असलेली ऐतिहासिक मैलांच्या दगडासह वरंध हिरडोशी व लोणंद येथील अशाच पद्धतीच्या शिल्पांचे अस्तित्व शासनाने जपणे आवश्यक असल्याचे मत महाड येथील सह्याद्रीगिरी भ्रमण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल वारंगे व इतिहास संशोधक डॉक्टर. अंजय धनावडे यांनी व्यक्त केले आहे.