कामठी: घटस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, आरोपी पतीचा शोध सुरू
Kamptee, Nagpur | Jun 27, 2026 जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विवाहितेची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला सौ. मंजू संदीप पचारे वय २७ हिचे लग्न २०२३ मध्ये संदीप रामजी पचारे याच्यासोबत झाले होते.