DLF मॉलमध्ये महिलेवर चोरीचा आरोप! बॅगेत तुपाचे-तेलाचे डबे नेताना VIDEO व्हायरल
नोएडाच्या सेक्टर 18 मधील DLF मॉलमध्ये एका महिलेवर चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, ही महिला बॅगेत तुपाचे आणि रिफाइंड तेलाचे डबे घेऊन जात असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोरूममधील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी महिलेला थांबवून तिच्याकडील सामानाची तपासणी केली. त्यानंतर तिला रंगेहाथ पकडल्याचा दावा केला जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, महिलेवर नेमकी कोणती कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
DLF मॉलमध्ये महिलेवर चोरीचा आरोप!
बॅगेत तूप-तेलाचे डबे; VIDEO व्हायरल
कर्मचाऱ्यांनी महिलेला रंगेहाथ पकडल्याचा दावा
नोएडा मॉलमधील चोरीचा VIDEO चर्चेत
#Noida #NoidaNews #Sector18 #DLFMall #Theft #ViralVideo #CrimeNews #NoidaPolice #BreakingNews #UttarPradesh #UPNews