शहादा: कहाटूळ येथील हेरंब पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल पंप भरण्यासाठी जाणाऱ्या दुचाकी स्वाराला वाहनाची धडक, १ जण जखमी
शहादा तालुक्यातील कहाटूळ येथील हेरंब पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल पंप भरण्यासाठी जाणाऱ्या दुचाकी स्वराला वाहनाने धडक दिल्याने दुचाकी एक जण जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजता घडली आहे याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तीन एप्रिल रोजी साडेतीन वाजता चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख भावसिंग पवार रा. निंभोरा ता.शहादा व त्याच्या मागे बसलेला गणेश विनोद ठाकरे हे दोघेजण जात असताना काढून हेरंब पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल भरण्यासाठी जात असताना चारचाकी वाहनाने धडक दिली.