शहादा: पाडळदा येथे श्रीकृष्ण मंदिरात आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत नमो युवा चौपाल उपक्रम पार पडला
शहादा तालुक्यातील पाडळदा येथे भारतीय जनता युवा मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नमो युवा चौपाल हा कार्यक्रम पार पडला. पाडळदा येथे श्रीकृष्ण मंदिरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी , नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनांत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नमो युवा चौपाल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.