शहादा: सावळदा येथील शेतकऱ्याने पेरा केलेले गव्हाचे पिक उगवले नाही, शहादाच्या एजन्सी व कंपनीकडून फसवणूक, कृषी विभागाकडून पंचनामा
शहादा तालुक्यातील सावळदा या गावातील राजपाल गिरासे या शेतकऱ्याने, शहादा येथील उपकार एजन्सीकडून ग्रीनगोल्ड परिपूर्ण कंपनीच्या बियाणे घेऊन गव्हाची लागवड केली होती, मात्र गहू पिकाची वाढच झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या नुकसान झाले आहे, एकीकडे कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आलेला आहे, परंतु उपकार एजन्सी आणि ग्रीनगोल्ड- परिपूर्ण या कंपन्यांवर कारवाई होणार का ? असा प्रश्न नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.