महाड: डिझेल दरवाढीचा फटका ! रायगडमध्ये मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावरच
Mahad, Raigad | Apr 3, 2026 डिझेल दरात झालेल्या तीव्र वाढीमुळे रायगड जिल्ह्यातील तसेच श्रीवर्धन तालुक्यातील मच्छीमार व्यवसाय अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी, अनेक यांत्रिक बोटी आज किनाऱ्यावरच उभ्या राहिल्या असून 'समुद्रात जाण्यापेक्षा बोट थांबवणे स्वस्त' अशी वेळ मच्छीमारांवर आली आहे. जीवना बंदर, मुळगाव कोळीवाडा, बागमांडला, दिघी, कुडगाव, आदगाव, शेखाडी, भरटखोल आणि दांडा कोळीवाडा या किनारी पट्टयात शेकडो बोटी सध्या निष्क्रिय अवस्थेत उभ्या असल्याचे चित्र दिसत आहे.