अंबरनाथ: बदलापूर एमआयडीसी परिसरातील गोडाऊनला लागली भीषण आग, परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
बदलापूर एमआयडीसी परिसरातील मानकिवली येथे गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. रासायनिक ड्रम चा साठा असलेल्या गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोडाऊन लगतच मानवी वस्ती आहे. त्यामुळे ही आग मानवी वस्तीत शिरू नये यासाठी अग्निशमन दल शर्तीने प्रयत्न करत आहेत. मानवी वस्ती लगत असलेल्या गोडाऊनला आग लागल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे