अंबरनाथ: ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेत सर्वाधिक मतदान, अंबरनाथ मध्ये सर्वात कमी मतदान
आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडली असून आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघाच्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान झालं असून सर्वात कमी मतदान हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात झाल आहे. शहापूर विधानसभेमध्ये ६८.३२ टक्के मतदान झाले आहे. तर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४७.७५ टक्के मतदान झालं आहे.