अंबरनाथ: अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला मुद्देमालासह केली अटक
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अमली पदार्थ शोध मोहीम राबवण्यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार कारवाई करत असताना अंबरनाथ येथे गांजा विक्रीसाठी एक महिला येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचून छापेमारी करून एका 29 वर्षीय महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून 51 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आणि महिलेला अटक केली.