सावनेर: खापा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध जुगाराच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास केले हद्दपार
Savner, Nagpur | Jul 4, 2026 पोलीस स्टेशन खापा हद्दीतील अवैध जुगार व्यवसायात सक्रिय आरोपी नितेश सुधाकर नंदनवार वय 33 वर्ष राहणार बाजार चौक खापा यास महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये नागपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले सराईत गुन्हेगार नामी नितेश सुधाकर नंदनवन याचे विरुद्ध अवैध जुगार बाबत अनेक गुन्हे नोंद असून आरोपी हा असे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे याला एक महिन्याकरिता नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण मधून हद्दपार केले आहे