आसाममध्ये कोलकाता-सैरंग एक्सप्रेसला भीषण अपघात! इंजिनासह ५ डबे रुळावरून घसरले
आसाममध्ये बुधवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात घडला. गुवाहाटीजवळील दिगारू रेल्वे स्थानक परिसरात कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:५४ च्या सुमारास दुसऱ्या ट्रेनला मार्ग देण्यासाठी एक्सप्रेस थांबवली जात असताना हा अपघात झाला. ईशान्य सीमा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप जीवितहानीची नोंद नाही; मात्र अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
#Assam #TrainAccident #Guwahati #KolkataSairangExpress #RailwayAccident BreakingNews IndianRailways आसाम रेल्वेअपघात गुवाहाटी
Pune City, Pune | Nov 11, 2026