भीषण दुष्काळात आंबेगावमध्ये जलवाहिनी फुटली; हायड्रॉलिक टेस्टिंग न करताच काम पूर्ण केल्याचा संशय!
आंबेगाव, पुणे : एकीकडे भीषण दुष्काळामुळे नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना आंबेगाव परिसरात जलवाहिनी फुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
जलवाहिनीचे काम हायड्रॉलिक टेस्टिंग न करताच पूर्ण करण्यात आले का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणात ठेकेदार, संबंधित अभियंते आणि सल्लागार यांची जबाबदारी निश्चित केली जाणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
#Ambegaon #PuneNews #WaterPipeline #WaterCrisis #CivicIssues
Pune City, Pune | Nov 23, 2026