दुकानात जायचे जिने पदपथावर पालिकेच्या कारवाईला होणारा विरोध झुगारून केलेल्या कारवाई नंतर व्यापारी संतप्त
वारजे नाक्यावरील तपोधाम जवळ असलेल्या कनिष्क रेस्टॉरंट आणि बार जवळील राज बिअर शॉपी आणि शिवम कलेक्शन या दुकानांचे जिने पदपथावर येत असल्याने पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 3 च्या कनिष्ठ अभियंता आशिष पवार यांच्या माध्यमातून कारवाई सुरू होती. यावेळी व्यापाऱ्यांनी केलेला विरोध झुगारून ही कारवाई करण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांची मागणी देखील रास्त होती. मात्र नियम आणि कायद्यानुसार कारवाईचे आदेश देखील होते. अशावेळी कोण बरोबर आणि कोण चूक याचा ताळमेळ साधणे केवळ अशक्य ठरत होते.
#pune
#unauthorizedconstruction #constructiondemolishion #checkmatetimes #warje
Pune City, Pune | Nov 24, 2026