नागपूर शहर: घरी इलेक्ट्रिक काम करताना करंट लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, लकडगंज हद्दीतील घटना
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महाल परिसरातील गरुडखांब भागात एका घरामध्ये इलेक्ट्रिकचे काम करत असताना अचानक शॉक लागल्याने २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अमन कांताप्रसाद सोनी असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमन सोनी हा महाल परिसरातील गरुडखांब मध्ये राहणाऱ्या श्रीमती संगीता तलवारे यांच्या घरी इलेक्ट्रिकचे काम करत होता.