उमरेड: उमरेडमध्ये कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Apr 4, 2026 गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरेड पोलिसांनी मौजा हेवती शिवारात सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १३ आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ७ दुचाकी वाहने, २ जिवंत कोंबडे आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख १६ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.