बदनापूर: बस स्थानक परिसरात आग लागून जळालेल्या दुकानाची आमदार नारायण कुचे यांनी केली पाहणी
Badnapur, Jalna | Jun 10, 2026 आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी शहरात अचानक आग लागून जळालेल्या दुकानाची घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आहे, शहरातील भाजपा कार्यकर्ते महेश लड्डा यांच्या दुकानाला आग लागून लाखोचे साहित्य जळून खाक झाले असून या नुकसानाची पाहणी करत प्रशासनाने पंचनामे करून योग्य मावेजा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.