बदनापूर: शहरातील आजा चौक येथे ईद-ए-मिलांचा कार्यक्रम संपन्न, कार्यक्रमाला मान्यवरांनी लावली उपस्थिती
Badnapur, Jalna | Apr 12, 2026 आज दिनांक 12 एप्रिल 2026 वार रविवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील आझाद चौक येथे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बदनापूर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद मिलन च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या कार्यक्रमाला माजी मंत्री राजेश भैय्या टोपे ,माजी आमदार संतोष सांबरे, सुधाकर दानवे, राष्ट्रवादी नेता शमीम मिर्झा यांच्यासह बदनापूर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली होती.