महाड: महाडजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी
Mahad, Raigad | May 13, 2026 गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील चांढवे बुद्रुक गावच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अशोक महादेव राऊत (वय ७९) असे मृताचे नाव आहे. दहिसर, मुंबई येथील राऊत कुटुंबीयांच्या कार व कंटेनर यांचा भीषण अपघात झाला. राऊत कुटुंबातील अन्य काही सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेल कृष्णा समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला स्विफ्ट डिझायर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.