महाड: महाड डम्पिंग ग्राउंडमुळे २१ वाड्यांचे आरोग्य धोक्यात
Mahad, Raigad | Apr 18, 2026 महाड नगर परिषदेच्या लाडवली (ता. महाड) येथील कचरा डम्पिंग ग्राउंड मुळे पाचशे मीटरवर असलेल्या गोंडाळेसह सुमारे 21 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर धडक देऊन नगराध्यक्ष सुनील कविस्कर व मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांची भेट घेतली व डम्पिंग ग्राउंड त्वरित बंद करण्याची मागणी गोंडाळे ग्रा.पं.चे सरपंच आशिष खताते, उपसरपंच घनश्याम शेडगे यांच्यासह गोंडाळे गावाच्या परिसरातील 21 वाड्यावरील ग्रामस्थांनी केली आहे.