उमरेड: : अवैध दारूचा साठा जप्त; १.३३ लाखांचा मुद्देमाल नष्ट
Umred, Nagpur | Jul 6, 2026 पाचगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा चांपा पारधी बेडा येथे राहुल वरदार पवार याने अवैध गावठी दारू आणि रसायन साठवून ठेवले होते. पोलिसांनी कारवाई करत १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा दारूसाठा व इतर साहित्य जप्त केले असून, दारू व रसायन घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी राहुल पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.