बदनापूर: हॉटेल फर्न जालना शहर येथे शिवसंवाद मेळाव्याला बदनापूर तालुक्यातील हजारो शिवसैनिकांनी लावली उपस्थिती
Badnapur, Jalna | May 27, 2026 आज दिनांक 27 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील भोकरदन नाका येथे असलेल्या हॉटेल फर्न येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते खा.डॉ.श्रीकांत शिंदे हे उपस्थित झाले होते या मेळाव्याला बदनापूर तालुक्यातील हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती, तसेच आ. अब्दुल सत्तार ,आ.व मंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.