महाड: सुवर्णमंदिराच्या धर्तीवर चवदारतळ्याचे जलशुद्धीकरण
Mahad, Raigad | Apr 18, 2026 महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचे पाणी शुद्ध करून नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी मंत्री भरत गोगावले यांनी स्वतः अमृतसर येथे जाऊन सुवर्ण मंदिर तलावाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा अभ्यास केला. महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चवदार तळे पाणी शुद्धीकरण प्रकल्प व परिसर सुशोभीकरणासाठी 55.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.