श्री. सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक सोलापूर येथे ३००+ विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे जागरूकता व डिजिटल सुरक्षा मार्गदर्शन व्याख्यान.
सोलापूर, दि. १६ ऑक्टोबर २०२६ :
मा. पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (गुन्हे व विशेष शाखा) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक सोलापूर येथे महाविद्यालयातील ३००+ अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थिनींसाठी सायबर गुन्हेविषयक जागरूकता आणि डिजिटल सुरक्षा मार्गदर्शन” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करावा, विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करता यावे, या उद्देशाने सदर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत अत्यंत उपयुक्त व प्रात्यक्षिक स्वरूपाची माहिती देण्यात आली.
यावेळी महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे तसेच सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री. अविनाश पाटील, पो.कॉ. अंबलगी यांनी ऑनलाइन आर्थिक फसवणूक, फिशिंग, ओटीपी फसवणूक, यूपीआय फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा, सायबर बुलिंग, बनावट प्रोफाइल, डिजिटल अटक, ए.आय. / डीपफेक आधारित फसवणूक, पासवर्ड सुरक्षा, मोबाईल सुरक्षा, म्यूल अकाउंट तसेच सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संशयास्पद लिंक व कॉल कसे ओळखावेत, वैयक्तिक व आर्थिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गजानन धरणे सर, प्राध्यापक पाटील मॅडम व सर्व अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग मोठ्या संखयेने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये Cyber Security Awareness, Digital Responsibility आणि Safe Digital Practices याबाबत सकारात्मक व प्रभावी जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
36 views | Solapur, Maharashtra | Oct 16, 2026