St. Joseph High School and Jr. College येथे ६००+ विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे जागरूकता व डिजिटल सुरक्षा मार्गदर्शन व्याख्यान
सोलापूर, दि. १५ ऑक्टोबर २०२६ :
मा. पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (गुन्हे व विशेष शाखा) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली St. Joseph High School and Jr. College, Solapur येथे महाविद्यालयातील ६००+ विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हेविषयक जागरूकता आणि डिजिटल सुरक्षा मार्गदर्शन” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करावा, सुरक्षित डिजिटल व्यवहारांची सवय लावून घ्यावी तसेच विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करता यावे, या उद्देशाने सदर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत अत्यंत उपयुक्त व प्रात्यक्षिक स्वरूपाची माहिती देण्यात आली.
व्याख्यानामध्ये Online Financial Fraud, Phishing, OTP Fraud, UPI Fraud, Social Media Security, Cyber Bullying, Fake Profile, Digital Arrest, AI/Deepfake आधारित फसवणूक, Password Security, Mobile Security, Mule Account तसेच सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, संशयास्पद लिंक व कॉल कसे ओळखावेत, वैयक्तिक व आर्थिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे, तसेच सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री. अविनाश पाटील, पो.कॉ. अंबलगी व पो.कॉ. रतिकांत राजमाने यांनी सायबर सुरक्षेच्या विविध बाबींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य व उप-प्राचार्य यांच्यासह विद्यालयातील प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
“सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी तंत्रज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाची आहे जागरूकता; सावध रहा, सुरक्षित रहा आणि जबाबदारीने डिजिटल व्यवहार करा.”
या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये Cyber Security Awareness, Digital Responsibility आणि Safe Digital Practices याबाबत सकारात्मक व प्रभावी जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
40 views | Solapur, Maharashtra | Oct 16, 2026