रामटेक: एस एफ आय व डी वाय एफ आय द्वारे रामटेक येथे उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न
Ramtek, Nagpur | Mar 7, 2026 स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया (एस एफ आय) व डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (डी वाय एफ आय) कमिटी रामटेक च्या वतीने शनिवार दिनांक 7 मार्चला दुपारी बारा वाजता पासून रामटेक येथे भारतातील गुणवत्ता पूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच सावित्रीबाई फुले जयंती व नौजवान भारत सभेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.