पालघर: वसई- सनसिटी परिसरात कारचा अपघात
कारचा भीषण अपघात वसईतील सनसिटी परिसरात घडला आहे. महिला कार चालवत असताना दुभाजका नजीक असलेल्या एका खांबाला या कारने जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, कारचालक महिला किरकोळ जखमी झाले आहेत. कारने दिलेली ही धडक इतकी भीषण होती की कारची एअरबॅग देखील उघडली. कारच्या बोनेटचा भाग निखळून पडला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे