उमरेड: पाचगाव पोलिसांची मोठी कारवाई; मोहफुलाची हातभट्टी उद्ध्वस्त, ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
Umred, Nagpur | Apr 12, 2026 मौजा वडद शिवारात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मोहफुलाच्या गावठी दारूभट्टीवर पाचगाव पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २०० लिटर मोहफूल सडवा, ५० लिटर तयार दारू, १२ प्लास्टिक व लोखंडी ड्रम आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून घटनास्थ