साडेतीन लाखांसाठी मृतदेह रोखल्याचा आरोप! केईएम रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह
पुण्यातील केईएम रुग्णालय प्रशासनावर पोलीस अंमलदार सुरेश कांबळे यांच्या मृत्यूनंतर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, मृतदेह ताब्यात देण्यास सुमारे १२ तास विलंब झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांनी राज्य सरकारला पत्र लिहून संबंधित रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपांवर केईएम रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर येणे बाकी आहे.
KEM Hospital Pune, केईएम रुग्णालय प्रकरण, सुरेश कांबळे मृत्यू प्रकरण, मृतदेह अडवणूक आरोप, साडेतीन लाखांची मागणी, पुणे रुग्णालय वा�
Pune City, Pune | Nov 24, 2026