कामठी: शॉर्ट सर्किटमुळे रनाळा ग्रामपंचायत कार्यालयात आग; महत्त्वाचे शासकीय रेकॉर्ड जळून खाक
Kamptee, Nagpur | May 22, 2026 कामठी तालुक्यातील रनाळा ग्रामपंचायत कार्यालयात आज संध्याकाळी एक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत ग्रामपंचायतीचे अत्यंत महत्त्वाचे सरकारी रेकॉर्ड, कागदपत्रे आणि कॉम्प्युटर सिस्टीम जळून पूर्णपणे खाक झाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास रनाळा परिसर आणि परिसरात विजेचा मोठा लपंडाव सुरू होता. याच दरम्यान ग्रामपंचायतीच्या रेकॉर्ड रूममधील इलेक्ट्रिक बोर्डमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले.