बदनापूर: कन्हैया नगर येथे आमदार नारायण कुचे यांनी घेतले संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन
आज दिनांक 4 जुलै 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 : 30वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पवित्र पालिकेचे जालना शहरात आगमन झाले असता याप्रसंगी त्यांनी मनोभावी पूजन करत या पालखीचे दर्शन घेतले आहे यानंतर आलेल्या भाविक भक्तांची व पालखी सोहळ्यात आलेल्या वारकरी सांप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे.