उमरेड: ९० दिवस काम केल्याची खोटी प्रमाणपत्रे देऊन शासनाची फसवणूक; बेला ठाण्यात गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Jun 1, 2026 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.मंडळाच्या योजनांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींनंतर, अपर कामगार आयुक्त नागपूर यांच्या निर्देशानुसार विशेष दक्षता पथकाने विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवली.