बदनापूर: पानखेडा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आमदार नारायण कुचे यांनी लावली उपस्थिती
आज दिनांक 9 मे 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील पानखेडा येथे गावकऱ्यांच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थिती लावली आहे, हा खंड हरिनाम सप्ताह साथ मे पासून सुरू झाला असून त्याचा 3 दिवस आहे,आणि त्या पार्श्वभूमीवर आमदार नारायण कुचे यांनी या सप्ताह उपस्थिती लावत भावीक भक्तांशी संवाद साधला आहे.