महाड: महाड देवस्थानच्या जागेची मोजणी रोखली
Mahad, Raigad | Jun 14, 2026 अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या महाड येथील श्री वरद विनायक मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. यासाठी देवस्थानच्यावतीने परिसरातील जागेचा सर्व्हे केला जात आहे. मात्र, या मोजणीला मंगलम कापूर उत्पादक कंपनीने विरोध दर्शविल्याने कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या कंपनीमध्ये कंपनीत श्री. क्षेत्र महाड देवस्थानची 52 गुंठे जागा मुख्य प्रवेशद्वारासमोर असल्याचे निष्पन्न झालेले आहे. या जागेची रितसर शासकीय सर्व्हे करण्यासाठी अधिकारी व देवस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कंपनीत आले होते.